Sri Lanka Presidential Election: रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

WhatsApp Group

Sri Lanka Presidential Election: रानिल विक्रमसिंघे हे आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती असणार आहेत. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. दुल्लस अल्हपेरुमा यांना 82 मते मिळाली तर अनुरा कुमारा डिसनायके यांच्या बाजूने फक्त 3 मत मिळाली.

श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन करून राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. त्यानंतर आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली.