मुंबई – केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना Narayan Rane त्यांच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी महापालिकेनं नोटीस बजावली आहे. पालिकेचं पथक शुक्रवारी राणेंच्या बंगल्यात तपासणीसाठी जाणार आहे. अनधिकृत बांधकामांचं मोजमाप घेण्याचं काम हे पथक करेल.पालिकेच्या के-पश्चिम वॉर्डनं नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे.
जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी के-पश्चिम वॉर्डच्या इमारत प्रस्ताव विभागाचं पथक शुक्रवारी येईल. अनधिकृत बांधकामाची पडताळणी या पथकाकडून केली जाईल, असं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे