Brahmastra Trailer: रणबीर-आलियाच्या भव्यदिव्य ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

WhatsApp Group

Brahmastra Trailer: ‘ब्रह्मास्त्र’, बॉलिवूडचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही महिने बाकी आहेत. पण त्याआधी ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर रिलीज करून चाहत्यांची निराशा नक्कीच थोडी कमी झाली आहे. 2 मिनिट 51 सेकंदाचा हा ट्रेलर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. ट्रेलरमधील अनेक सीन्स अंगावर शहारे आणतात. ट्रेलरची सुरूवात होते ती अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजातील संवादाने.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एकीकडे रणबीर या चित्रपटात शिवाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे.