सोलापूर – जिल्ह्यातील गौडगाव इथले निवासी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ ) कार्यरत असलेले रामेश्वर काकडे Rameshwar Kakade यांना छत्तीसगढमध्ये वीरमरण आलं आहे. रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी काल समजली.
बार्शीपुत्र #रामेश्वर काकडे यांना #वीरमरण
बार्शी – तालुक्यातील गौडगावचे सुपुत्र रामेश्वर काकडे यांना नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आले.
भावपुर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/CQLfLQUw8x
— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) March 17, 2022
२०१२ शहीद जवान रामेश्वर काकडे हे सैन्यदलात रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील सेवा बजावली होती. छत्तीसगडमधील रायपूर भागात कार्यरत होते, बुधवारी पहाटे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आहे.