राम चरण मुलीला मुकेश अंबानींकडून 1 कोटींचा पाळणा? व्हिडिओ पहा

WhatsApp Group

राम चरण आणि उपासना यांच्या घरी 20 जून रोजी एका छोट्या देवदूताचा जन्म झाला. या बाळाचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून भव्य स्वागत करण्यात आले. ३० जून रोजी मुलीचे नामकरण समारंभही झाला. दरम्यान, राम चरण आणि उपासना यांच्या मुलीला अंबानी कुटुंबाने खूप महागडे गिफ्ट दिल्याची बातमी समोर येत आहे.

पिंकविलाने  लिहिले आहे की मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने राम आणि उपासना यांच्या मुलीला सोन्याचा पाळणा भेट दिला आहे. वृत्तानुसार, या पाळण्याची किंमत करोडोंमध्ये आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

हैदराबादच्या जुबली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासना यांनी 20 जून रोजी एका मुलीला जन्म दिला. दादा चिरंजीवी, अल्लू अर्जुनसह अनेक लोक उपासना आणि बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. चिरंजीवीने आपल्या नातवाचे नाव मेगा प्रिन्सेस ठेवले आहे.