Raksha Bandhan 2023 Marathi Messages : रक्षाबंधन निमित्त आपल्या भावाला आणि बहीणीला संदेश शेअर करून साजरा करा रक्षाबंधन

0
WhatsApp Group

यावर्षी 30 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन Raksha Bandhan 2023 सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर एक संरक्षक धागा बांधतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन घेतात. अशा परिस्थितीत, हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी, राखीच्या या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या भावा आणि बहिणीला शुभेच्छा देऊ शकता. आजचा लेख याच विषयावर आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावा आणि बहिणीला कोणत्या प्रेमळ शुभेच्छा पाठवू शकता ते सांगणार आहोत.

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

🎁🎉 बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी……. ✨

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
🎁🎉 राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎁🎉

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
🎁🎊 HAPPY RAKSHA BANDHAN! 🎁🎊

राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
🎁🎊 रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎊

सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉