राखी सावंतला आदिवासी वेषभूषेची मस्करी करणं पडलं महागात, गुन्हा दाखल

WhatsApp Group

अभिनेत्री राखी सावंतवर रांचीच्या एसटी-एससी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा केंद्रीय सरना समितीने नोंदवला आहे. राखी सावंतने बेली डान्स ड्रेसचे वर्णन आदिवासी ड्रेस असे केले होते. राखी सावंतने आदिवासींचा पेहराव सांगून अश्लीलतेची परिसीमा ओलांडल्याचे समितीचे म्हणणे आहे. खरं तर, राखी सावंतचे नवीन गाणे ‘मेरे वर्गा’ रिलीज होणार आहे.

या गाण्याच्या प्रमोशनसाठी राखी सावंतने तिच्या ड्रेसचे वर्णन ‘आदिवासी पोशाख’ असे केले होते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती तिच्या पोशाखाची तुलना आदिवासी लूकशी करताना दिसत होती. या लूकमुळे राखी सावंतही ट्रोलच्या निशाण्यावर आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतला एंटरटेनमेंट क्वीन म्हटले जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते, परंतु अनेक वेळा राखी तिच्या फॅशन सेन्सने मर्यादा ओलांडताना दिसते. दरम्यान तिच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)