
ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह दिसत नाही. रोज नव्या कारणामुळे ती चर्चेत असते. वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकते. सध्या मात्र राखीची दयनीय अवस्था झाली आहे. शनिवारी रात्री ओशिवारा पोलिस ठाण्याबाहेर राखी सावंत ढसाढसा रडताना दिसली.
बॉयफ्रेन्ड आदिल दुर्रानीसोबत राखी पोलिस ठाण्यामध्ये पोहोचली. तिला पोलिस ठाण्यामध्ये येण्याचे कारण विचारले असता तिच्या अश्रूंचा बांध फुटला. कॅमेऱ्यांसमोरच ती ढसाढसा रडू लागली. आपला पूर्वाश्रमीचा पती रितेश आपला छळ करत असल्याचा, आपल्यावर संशय घेत असल्याचा आरोप तिने केला आहे.
View this post on Instagram
राखीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी रडत रडत पूर्वाश्रमीचा पती रितेशवर (Ritesh) गंभीर आरोप करताना दिसत आहे.