मी कधी गर्भवती होणार? लग्नाआधी गर्भवती राहिली तरी चालेल, नंतर लग्न करेन – राखी सावंत

WhatsApp Group

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर कपूर (Ranabir Kapoor) यांचं गेल्या काही दिवसांपूर्वीच लग्न झालं आहे. बॉलिवूडमधील क्युट कपल (Bollywood Cute Couple) म्हणून दोघांकडे बघितलं जातं. अशातच आलिया भट्टने 27 जून रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. आलियाने सोशल मीडियावर रणवीर सोबतच एक फोटो (Alia-Ranabir Photos) शेअर केला होता. या फोटोला ‘आमचं बाळ लवकरच येत आहे’ असं कॅप्शन आलियानं दिल आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत आलिया आणि रणवीर याला शुभेच्छा दिल्या आहे. या गुड न्यूजवर आता राखी सावंतने (Rakhi Sawant) देखील आपली हटके प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतने आलियाला शुभेच्छा तर दिल्याचं मात्र स्वतःची इच्छा देखील तिने व्यक्त केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या राखीच्या या व्हिडीओमध्ये काही लोक तिला आलिया आणि रणबीरच्या गूड न्युजबाबत सांगत आहे. यावर तात्काळ रिअॅक्शन देत, ‘मी कधी गर्भवती होणार? लग्नाआधी देखील गर्भवती राहिली तरी चालेल, नंतर लग्न करेन. सध्या असच सुरु आहे लोक लग्नाआधी गर्भवती राहत आहे, असं राखी म्हणाली.