राखी सावंत ढसाढसा रडली, हात जोडून म्हणाली – माझ्या भाईजानला…

0
WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यापासून चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. चाहत्यांपासून ते अभिनेत्याच्या कुटुंबीयांपर्यंत सगळेच चिंतेत आहेत. मात्र, पोलिसांनी दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच अभिनेत्याच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, सलमानच्या सुरक्षेबाबत चिंतेत असलेली राखी सावंत ढसाढसा रडताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हिडिओमध्ये राखी सावंत ढसाढसा रडली
राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून दुबईत आहे. ती सलमान खानला आपला भाऊ मानते. वांद्रे येथील अभिनेत्याच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याचे समजताच ड्रामा क्वीन चांगलीच घाबरली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत लोकांनी सलमान खानसोबत असे करू नये असं ती म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे, ‘माझ्या भावासोबत असे करू नका, कृपया… मी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती करते. त्यांनी अनेक लोकांची घरे वाचवली.. अनेक गरीब लोकांचे भले केले.. तुम्हाला काय मिळणार? प्लीज.. मी तुझ्यासमोर हात जोडते.. असं करू नका..’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या
विशेष म्हणजे रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. गोळी झाडली तेव्हा सलमान खान घरी उपस्थित होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र, मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले असून दोन्ही दुचाकीस्वार शूटरना अटक करण्यात आली आहे.