
राखी सावंतचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला समजेल की, राखी सावंतला फक्त ‘ड्रामा क्वीन’ म्हटलं जात नाही तर ती खरंच एक मोठी ड्रामा क्वीन आहे. राखीने नुकताच तिचा नवा बॉयफ्रेंड बनवला आहे. दरम्यान, राखीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे. तिने तिच्या टी-शर्टमध्ये काहीतरी भरलं आहे, जे पाहून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
राखी सावंतने तिच्या पोटात दोन फुगे टाकल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्यामुळे तिचे पोट खूपच मोठं दिसत आहे. त्यानंतर तिने तिचं नेहमीप्रमाणे नाटक सुरू केलं. ती तिथे असलेल्या व्यक्तींना सांगते की, “देवाने मला सांगितलं आहे की मी अशा देवदूत, अशा पैगंबरला जन्म देईन, जो अशा पाप करणाऱ्यांना… यानंतर बाजूला इशारा करून ती म्हणते, “माझी मुलं आहेत. अशा सर्व लोकांना सुधारणार आहे, जे खूप पाप करतात.”
View this post on Instagram
याचबरोबर राखी सावंत तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला विचारलं, ‘बाहुबली येणार आहे का?’ यावर राखी सावंत जोरात ओरडून म्हणाली की, “हो, बाहुबली येईल, लवकरच, मला अशा पाप्यांना सुधारायचे आहे.” बाहुबली येणार आहे. लवकरच..” राखीचं हे कृत्य पाहून तिथे उभ्या असलेल्या लोकांना हसू आवरत नाही. यानंतर, राखी सावंतसोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीने फुगे काढून ड्रामा क्वीनच्या नाटकाचा पर्दाफाश केला. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले.