भारताचे वॉरेन बफे राकेश झुनझुनवाला यांचे निधन, 62व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

भारतीय गुंतवणूकदार आणि व्यापारी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही म्हणतात. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. झुनझुनवाला यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ आणि सिडनहॅम कॉलेजमध्ये झाले. ते एक मोठे भारतीय गुंतवणूकदार आणि व्यापारी होते.

राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.