
मुंबई – आताच राजकरण सूडबुद्धीच राजकारण आहे, त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे असा खोचक सल्ला शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. दीपाली सय्यद कल्याण पूर्वेत खडेगोळवली येथे माजी महापौर रमेश जाधव यांच्या कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी हा सल्ला दिला आहे.
मतपत्रिका इतरांना दाखवल्याचा आरोप करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , आमदार सुहास कांदे आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांची मतं अवैध करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर शिवसेना प्रवक्ता दीपाली सय्यद यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना खोचक सल्ला दिला आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, “जे काही होणार आहे ते कायद्याप्रमाणेच होणार आहे. मात्र मी जितेंद्र आव्हाड साहेबांना एवढचं सांगेन की राजकारणात डावपेच असतात ते शिकून येणं गरजेचं असतं. नक्की काय खरं आहे, काय खोटं आहे हे त्यानांच माहित. पण जर अशा पद्धतीने काही झाले असेल तर आव्हाड साहेबांनी सांभाळून चाललं पाहिजे. काही नियम असतात त्याच्यामुळे आपल्याला काही परिणाम होवू नये, कारण आता जे राजकारण आहे ते सूडबुद्धीच राजकारण आहे, सूडाचं राजकरण आहे. त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे असं दीपाली सय्यद यावेळी बोलताना म्हणाल्या.