Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात; सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यामध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
रिंगणातील उमेदवार
भाजप : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक
शिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार
राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल
काँग्रेस : इम्रान प्रतापगडी