
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मागील एक आठवड्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके देखील मंदावले आहेत.