Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल मोठे अपडेट, 15 दिवसांनी आले शुद्धीवर

WhatsApp Group

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असलेले कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 15 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना करत आहेत, दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत आज एक मोठे अपडेट समोर आले आहे. आज १५ दिवसांनी त्यांना शुद्धी आली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा 

राजू श्रीवास्तव यांच्या पर्सनल सेक्रेटरी यांनी माहिती दिली की, “कॉमेडियनला आज शुद्धी आली आहे आणि दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांकडून त्याच्यावर देखरेख केली जात आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे.” 10 ऑगस्ट रोजी त्यांना जिममध्ये वर्कआउट करताना छातीत दुखू लागल्याने आणि ते कोसळल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत आदल्या दिवशी जारी केलेल्या अपडेटमध्ये त्यांचा मेंदू वगळता संपूर्ण शरीर काम करत असल्याचे सांगण्यात आले. मेंदूचा संसर्गही दूर झाला आहे. राजू श्रीवास्तव यांना न्यूरो फिजिओथेरपी दिली जात आहे. सध्या त्यांच्यावर एम्सच्या न्यूरोलॉजीच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.