IND vs BAN: रजत पाटीदार की राहुल त्रिपाठी, कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या बेस्ट Playing 11

WhatsApp Group

IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चितगावच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिले दोन वनडे गमावल्यामुळे भारतीय संघ क्लीन स्वीप टाळू इच्छितो. तिसर्‍या एकदिवसीय संघात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते जाणून घेऊया.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून बांगलादेश संघ प्रथमच टीम इंडियाला क्लीन स्वीप देऊ शकतो. त्याचबरोबर टीम इंडियाची नजर पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्यावर असेल. मात्र टीम इंडिया या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. याशिवाय, दीपक चहर तिसऱ्या वनडेमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. विकेटकीपर फलंदाज केएल राहुल तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. अशा स्थितीत राहुलसमोर पहिले आव्हान असेल ते प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे. रोहित शर्माच्या जागी कोणाला संधी द्यायची, हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रजत पाटीदार, इशान किशन आणि राहुल त्रिपाठी हे तिघेही संघातील स्थानाचे दावेदार आहेत.

दीपक चहरच्या जागी या खेळाडूला मिळू शकते संधी 

चायनामन स्पिनर कुलदीप यादव तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त दीपक चहरऐवजी कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.