IPL 2022: सलग आठ पराभवाच्या नामुष्कीनंतर मुंबई इंडियन्स आतातरी जिंकणार का?

WhatsApp Group

आयपीएल 2022 चा 44 वा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स Rajasthan Royals vs Mumbai Indians यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या मोसमात मुंबईची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून एकाही सामन्यात यश आले नाही.तर दुसरीकडे, राजस्थानने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये, राजस्थान दुसऱ्या स्थानी आहे तर मुंबईचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

आकडेवारी कोणाच्या बाजूने – राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले गेले आहेत. यात मुंबईने 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने 12 सामने जिंकले आहेत.

नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी चांगली आहे, येथे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत होईल. 180+ धावांचे लक्ष्य येथील संघांसाठी कठीण आहे. पण या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीला 200 पेक्षा जास्त धावसंख्याही रोखता आल्या नव्हत्या.

मात्र दुसऱ्या सामन्यात 129 धावांचे लक्ष्यही अवघड वाटत होते. तिसऱ्या सामन्यात येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने विजय मिळवला. 194 धावांचे लक्ष्य राखताना राजस्थानने मुंबईला 170 धावांवर रोखले होते. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार हे पहावे लागणार.

राजस्थान रॉयल्सचा संघ – जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, डॅरिल मिशेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन. मुंबई इंडियन्सचा संघ – इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.