यावर्षी कसा आहे राजस्थान रॉयल्सला संघ?

WhatsApp Group

राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals हा आयपीएलचा पहिला विजेता संघ आहे. २००८ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात  राजस्थानने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला होता. त्यांनी २००८ आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाचा पराभव केला होता. यंदा म्हणजेच आयपीएल IPL 2022 मध्ये आता राजस्थान रॉयल्स नव्या उत्साहात आणि नव्या खेळाडूंसह खेळताना दिसणार आहे. यंदाच्या लिलावात संघाने भूतकाळातील चुकांमधून धडा घेत युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणावर भर दिला आहे. संघाकडे संजू सॅमसनच्या रूपाने युवा कर्णधार आहे, तर कुमार संगकारा आणि लसीथ मलिंगा यांसारखी मोठी नावे कोचिंग स्टाफचा भाग आहेत. पहिल्या सत्रापासून आजवर हा संघ तीन वेळा प्लेऑफचा भाग बनू शकला आहे.

सुरुवातीच्या मोसमात राजस्थान रॉयल्सने अनुभवावर खूप भर दिला होता. शेन वॉर्न आणि राहुल द्रविड हे या संघाचा भाग होते. मध्यंतरीच्या वर्षांत या फ्रँचायझीने बड्या नावांकडे आपले लक्ष वळवले. या कारणास्तव बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ ही नावे या संघात होती. यादरम्यान त्यांनी लिलावात काही खेळाडूंवर भरपूर पैसेही खर्च केले. पण आता असे दिसते आहे की संघ पुन्हा आपल्या सुरुवातीच्या वर्षांच्या रणनीतीकडे जात आहे.

संजू सॅमसनच्या sanju samson नेतृत्वाखालील संघाकडे फलंदाजीत अप्रतिम फलंदाज आहेत. सॅमसन व्यतिरिक्त, जोस बटलर, रेसी व्हॅन डर ड्यूसेन, डेरिल मिशेल आणि शिमरोन हेटमायर यांसारखी प्रसिद्ध नावे फलंदाजीचा भाग आहेत. त्याच बरोबर त्याच्याकडे देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, रियान परागसारखे युवा फलंदाज देखील आहेत.

वेगवान गोलंदाजीत त्याच्याकडे ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा अशी रोमांचक नावे आहेत. दुसरीकडे, ओबेद मॅकॉय आणि जिमी नीशम सारखे अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघाला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. संघाच्या फिरकी विभागात आर अश्विन, युझवेंद्र चहलसारखे मोठे खेळाडू आहेत. केसी करिअप्पा आणि तेजस बारोका सारखे फिरकीपटू देखील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहेत.

असा आहे राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ

संजू सॅमसन (14 करोड)
जोस बटलर (10 करोड)
यशस्वी जयसवाल (4 करोड)
आर अश्विन (5 करोड)
ट्रेंट बोल्ट (8 करोड)
शिमरोन हेटमायर (8.5 करोड)
देवदत्त पडीक्कल (7.75 करोड)
प्रसिद्ध कृष्णा (10 करोड)
युजवेंद्र चहल (6.5 करोड)
रियान पराग (3.8 करोड)
केसी केरियप्पा (30 लाख )
नवदीप सैनी (2.60 करोड)
ओबेड मैकॉय (75 लाख )
अरुणय सिंह (20 लाख )
कुलदीप सेन (20 लाख )
करुण नायर (1.40 करोड)
ध्रुव जुरेल (20 लाख )
तेजस बरोका (20 लाख )
कुलदिप यादव (20 लाख )
शुभम गढ़वाल (20 लाख )
डेरिल मिशेल (75 लाख)
रासी वैन डेर डुसेन (1 करोड)
नाथन कुल्टर नाइल (1 करोड)
जिमी नीशम (1.50 करोड)

महत्वाच्या बातम्या 

ठाकरेंच्या कुटुंबापर्यंत पोहोचली ED: उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांच्या कंपनीचे 6.5 कोटी किमतीचे 11 फ्लॅट सील, मनी लाँड्रिंगचा संशय

IPL: अमित मिश्राच्या नावावर सर्वाधिक हॅट्रिक्स, दुसऱ्या स्थानी आहे युवराज सिंग!

जाणून घ्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल

धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार, अजित पवारांची विधानसभेत माहिती