RR Vs MI: हार्दिक पांड्याच्या खराब कॅप्टन्सीमुळे मुंबईचा पराभव, राजस्थानने 9 विकेटने दिली मात

0
WhatsApp Group

RR Vs MI: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हाय व्होल्टेज सामना खेळला  गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. राजस्थानला विजय मिळवण्यासाठी 180 धावा करायच्या होत्या. राजस्थान रॉयल्सने हा सामना 9 गडी राखत जिंकला आहे. मुंबईसाठी तिलक वर्माने सर्वात मोठी खेळी खेळली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानविरुद्ध मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात रोहित शर्माला बाद करून ट्रेंट बोल्टने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर इशान किशन खाते न उघडताच बाद झाला. सूर्यकुमार यादव 10 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे पॉवर प्लेमध्ये मुंबईने 3 महत्त्वाचे विकेट गमावले. मोहम्मद नबी 23(17), नेहल वडेरा 49(24), हार्दिक पंड्या 10(10), टिम डेव्हिड 3(5) धावांवर बाद झाले. पण टिलक वर्माने आजच्या सामन्यात मुंबईसाठी अप्रतिम खेळी केली. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण हा फलंदाज क्रीजवर ठाम राहिला. त्याने 45 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या.

राजस्थानची अप्रतिम गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज संदीप शर्मा माघारी परतला आणि त्याने विकेट-टेकिंग गोलंदाजी सुरू केली. त्याने मुंबईसाठी महत्त्वाच्या 5 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्टने 2, आवेश खान आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

हार्दिक पांड्याची खराब कॅप्टन्सी

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 179 धावा केल्या. या सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. यानंतर चाहते हार्दिकवर संतापले. चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.

या सामन्यात हार्दिक पांड्याने 10 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. यानंतर फुलटॉसवर हार्दिक एलबीडब्ल्यू झाला. हार्दिकच्या खराब कामगिरीवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. चाहते सतत सोशल मीडियावर ट्विट करून पांड्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात.