LSG vs RR: राजस्थानचा लखनौवर 7 गडी राखत दणदणीत विजय
LSG vs RR: राजस्थान रॉयल्सने सलग चौथा सामना जिंकून विजयी चौकार ठोकला आहे. संजू सॅमसनच्या संघाने शनिवारी रात्री लखनौ सुपर जायंट्ससोबत खेळलेला सामना 7 विकेटने जिंकला. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थानने 19 षटकांत केवळ 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.
लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने 19 षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी पुढे जाऊ शकली असती, पण त्याआधी बटलर 18 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा करून यश ठाकूरचा बळी ठरला.
यानंतर यशस्वी 18 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला. तिसरी विकेट रियान परागच्या रूपाने पडली, जो 11 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. पण, त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाल्याने सामना राजस्थानच्या झोतात आला. एका टोकाकडून संजूने 33 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 71 धावा करून नाबाद माघारी परतला, तर दुसऱ्या टोकाकडून तो 34 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा करून नाबाद माघारी परतला. अशाप्रकारे लखनौ संघाने सलग चौथा सामना जिंकला असून आता हा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
Best Sanju Samson celebration ever. 💗🔥 pic.twitter.com/AfHH2PI68u
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 27, 2024
लखनौने 197 धावांचे लक्ष्य दिले होते
राजस्थान रॉयल्ससोबत झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 196 धावा केल्या. घरच्या मैदानावर एलएसजी या लक्ष्याचा बचाव करू शकेल, असे वाटत होते. पण, तसे होऊ शकले नाही आणि राजस्थानने त्याचा पाठलाग केला. राजस्थानच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर केएल राहुल 76 आणि दीपक हुड्डा यांनी 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
दोन्ही संघ
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.