
राज्यात सत्तांतराच्या घडामोडीनंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै दिवशी बोलावण्यात आले आहे. यामध्ये 3 जुलैला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक भाजपाच्या राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) विरूद्ध शिवसेनेच्या राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यामध्ये होणार आहे.
आज महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या राजन साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. राजन साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतसंघाचे आमदार आहेत. सलग 3 वेळेस ते या मतदारसंघातून विधिमंडळामध्ये निवडून गेले आहेत.
Maha Vikas Aghadi has fielded Shiv Sena MLA Rajan Salvi against BJP MLA Rahul Narwekar for the #Maharashtra Assembly’s Speaker post.
Elections for the same are to be held tomorrow, July 3.
— ANI (@ANI) July 2, 2022
दरम्यान कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार होताच रिक्त झालेल्या या पदासाठी कॉंग्रेस कडूनच उमेदवार दिला जाईल अशी अपेक्षा होती पण मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता आज महाविकास आघाडीकडून राजन साळवी या शिवसेना आमदाराचे नाव घोषित करण्यात आलं आहे. राजन साळवी यांनी सुनिल प्रभु, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला अर्ज दाखल केला आहे.