
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम आहेत. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. दौऱ्याची पुढील तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.
5 जूनच्या अयोध्या दौऱ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित… महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच… रविवार दि. 22 मे, सकाळी 10 वा. स्थळ – गणेश कला क्रीडा केंद्र,.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईमध्ये आले. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.