शिवसेनेतील सत्ताकारणावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) मोठा आदेश दिला आहे. पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाकडेच राहील, असा आदेश निवडणूक आयोगाने (ECI) दिला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असतानाच शिंदे गटाला मोठा विजय मिळाला. चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं…. #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023