राज ठाकरेंना केलेले समर्थन प्राजक्ता माळीला भोवणार? कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

WhatsApp Group

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यातच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेही राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं. पण आता हेच समर्थन प्राजक्ताला भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून तिची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी प्राजक्ता माळीविरोधात कायदेशी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

पाडव्याला ठाण्यामध्ये राज ठाकरे यांनी भोग्यांविरोधातली आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठीची एक जाहीर सभा घेतली होती. या सभेला प्राजक्ताने देखील उपस्थिती लावली होती. यानंतर ती मनसेमध्ये सहभागी होणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मात्र काही वेळाने प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती फक्त एक नागरिक म्हणून या सभेला गेल्याचे म्हणाली होती. तसेच आयुष्यात पहिल्यांदा जाहीर सभा पाहण्याचा अनुभव तिला घ्यायचा होता म्हणून ती राज यांच्या सभेला गेल्याचंही तिने यात स्पष्ट केलं होतं.