उद्धव ठकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का?; राज ठाकरेंचा सवाल

WhatsApp Group

पुणे – मनसेच्या (MNS) गुढी पाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे चांगलेच चर्चेत आले आहेत. गुढी पाडवा मेळ्यामध्ये त्यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंग्यावरुन इशारा दिला होता. यानंतर त्यांच्यावर राज्यातून टीका करण्यात आल्या. यानंतर मुंबईत शिवसेनेनेच्या झालेल्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

उद्धव ठकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना यांची सर्व आंदोलने फेल गेली आहेत. एकाही आंदोलनाला यश आलेले नाही, असा आरोप केला होता. या टीकेला आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात उत्तर दिले. उद्धव ठकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

मी आतापर्यंत जेवढी आंदोलने केली तेवढ्या सगळ्या आंदोलनांना यश आले आहेत. रेल्वे भरतीवेळी केलेली आंदोलनाही यश आले आहे. त्यावेळीपासूनच रल्वेची भरती त्या त्या राज्यातील भाषेमध्ये होत आहे. टोल नाक्यांच्या आंदोलनाही यश आले आहे. मी ज्यावेळी आंदोलने केली त्यावेळी पासूनच ६० ते ७० टोल नाके बंद केली आहेत, असंही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.