IMD weather Update: नववर्षाचे स्वागत पावसाने होणार, पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा

0
WhatsApp Group

राज्यात  थंडीची लाट पसरल्याने थंडीचा कहर वाढत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. त्यामुळे 48 तासांत राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास तापमानात घट झाल्याने थंडी वाढेल. याआधी गेल्या आठवड्यातही राज्यात कडाक्याची थंडी होती मात्र नाताळनंतर तापमानात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र आता पुन्हा तापमानात घसरण सुरू झाली असून थंडी वाढत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळेराज्यातील हवामानात बदल होत आहे. हवामान खात्याने इशारा जारी केला असून उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागात दाट धुके पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसांत मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांतील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

यावेळी तापमानाबद्दल बोलायचे झाले तर औरंगाबादचे तापमान 18.2 अंश सेल्सिअस आहे. कोल्हापुरात 18.2 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरचे तापमान 16.6 अंश सेल्सिअस, मुंबईचे 21.8 अंश सेल्सिअस, पुणे 15.4 अंश सेल्सिअस, नांदेडचे 18.8 अंश सेल्सिअस तापमान आहे.

48 तासांत पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून म्हणजेच रविवारपासून 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिंदी महासागर आणि आग्नेय अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या ढगांमुळे संपूर्ण राज्याच्या हवामानावर परिणाम होणार आहे. यासोबतच, हवामान खात्याने म्हटले आहे की, 3 जानेवारीपर्यंत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.