मुंबई – महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार पुढील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे Rain in Sindhudurg. सिंधुदुर्ग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये.
वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे आता राज्यात थंडीचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडला आहे. अवकाळी पावसामुळे थंडीत मोठी वाढ झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकरीही हैराण झाला आहे.