Rain Update : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी

WhatsApp Group

केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल झाल्याचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. मात्र आता मान्सूनने वेग घेतला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, आता मान्सून सक्रिय झाला आहे.

दरवर्षी 7  जूनला मान्सून राज्यात दाखल होतो. मात्र यंदा तो 11 जूनपासून लांबला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पुढे गेला होता. पण, आता येत्या दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या 4 आठवड्यांत देशभरात पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.