
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मान्सूनने जोरदार दणका दिला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
2 Jul: पुढील 4,5 दिवस #कोकण व #मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.पिवळा,केशरी इशारा.#विदर्भात 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पिवळा इशारा.#मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता,काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/jDS6EcLQQW— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 2, 2023