Rain Update: कोकणात जोरदार पावसाची शक्यता

0
WhatsApp Group

राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे शेतीसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आज दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, हवामान विभागाकडून पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.