Railway Recruitment 2025: रेल्वे भरतीची मोठी घोषणा! परीक्षा न देता मिळणार नोकरी, शिक्षणानुसार अर्ज करण्याची संधी

जर तुम्ही खेळाडू असाल आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर दक्षिण रेल्वेने तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेकडून क्रीडा कोट्याअंतर्गत भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १३ सप्टेंबर २०२५ पासून rrcmas.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२५ आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे – या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड केवळ क्रीडा चाचण्या, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल. त्यामुळे खेळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या उमेदवारांना थेट सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे.
कोणत्या खेळांतील उमेदवारांसाठी ही भरती?
दक्षिण रेल्वेने विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या खेळाडूंना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये अॅथलेटिक्स, बॉडीबिल्डिंग, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोहणे, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आदी खेळांचा समावेश आहे.
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा दाखवलेली, राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू या भरतीसाठी पात्र असतील.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
स्तर १ : किमान शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पदवी.
स्तर २/३ : १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
स्तर ४/५ : पदवी आवश्यक.
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे.
पगार आणि सुविधा
या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना दरमहा ₹१८,००० ते ₹२९,२०० पगार मिळणार आहे. याशिवाय एचआरए, डीए, वैद्यकीय सुविधा, पेन्शन यांसह अनेक सरकारी भत्ते उपलब्ध असतील.
अर्ज शुल्क
अनुसूचित जाती/जमाती, महिला, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क – ₹२५० (पूर्ण परतावा मिळणार).
इतर उमेदवारांसाठी शुल्क – ₹५०० (₹४०० परतावा मिळणार).
निवड प्रक्रिया
क्रीडाचाचण्या: उमेदवारांच्या खेळातील कामगिरीची पडताळणी केली जाईल.
प्रमाणपत्र पडताळणी: पदके, शैक्षणिक पात्रता आणि इतर कागदपत्रांची तपासणी होईल.
वैद्यकीय परीक्षा: शारीरिक तंदुरुस्तीची तपासणी होईल.
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट rrcmas.in ला भेट द्या.
होमपेजवर “२०२५-२६ क्रीडा कोटा भरती” या लिंकवर क्लिक करा.
नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि जन्मतारीख भरून नोंदणी करा.
मिळालेल्या नोंदणी क्रमांकाने लॉगिन करा.
शैक्षणिक माहिती व क्रीडा कामगिरीची अचूक माहिती भरा.
फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा.
शेवटी अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.
दक्षिण रेल्वेची ही भरती क्रीडाप्रेमी युवकांसाठी सरकारी नोकरीकडे नेणारी मोठी संधी आहे. जर तुम्ही खेळात उत्कृष्ट असाल, तर ही संधी गमावू नका. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२५ असल्याने इच्छुक उमेदवारांनी तात्काळ नोंदणी करावी.