
आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे. सध्या 100पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जेवण मागवताना प्रवाशांना आपल्या पीएनआरचा वापर करावा लागेल. प्रवाशांस थेट त्यांच्या आसनावर जेवण मिळेल.
सर्वात अगोदर प्रवाशांनी जूप व्हॉट्सॲप चॅटबोट नंबर 917042062070 सेव्ह करावा. – जूप चॅटबोटवर आपला 10 अंकी पीएनआर टाइप करा. – येणारे स्थानक व रेस्टॉरंटसचा पर्याय निवडा पेमेंट करा. – निवडलेले स्टेशन येताच जूप तुमचे जेवण पोहोचवेल.