राजस्थानमधील पाली येथे रेल्वे अपघात, सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

WhatsApp Group

राजस्थानमधील पाली येथे आज रेल्वे अपघात झाला. उत्तर पश्चिम रेल्वेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस ट्रेनचे 8 डबे आज पहाटे 3.27 वाजता जोधपूर विभागातील राजकियावास-बोमदरा सेक्शन दरम्यान रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. जोधपूरहून रेल्वेने अपघात निवारण ट्रेन पाठवली आहे. लवकरच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. जयपूर येथील मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून महाव्यवस्थापक-उत्तर पश्चिम रेल्वे आणि इतर उच्च अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कोणतीही जीवितहानी नाही

उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले, ‘बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे. वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. काही जखमी प्रवाशांना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत
जोधपूरसाठी: 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646
पाली मारवाडसाठी: 0293- 2250324, 0293- 2250138, 0293- 2251072
सीपीआरओ म्हणाले की, प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक कोणत्याही माहितीसाठी 138 आणि 1072 वर संपर्क साधू शकतात.