पुणे पलानी टास्कर्सवर भारी पडला रायगड मराठा मार्वेल्स

WhatsApp Group

पहिल्या दिवशी विजयी सलामी देणाऱ्या रायगड मराठा मार्वेल्स व पुणे पलानी टास्कर्स मध्ये आजच्या दिवसांचा शेवटचा सामना झाला. दोन्ही संघांनी शांत व संयमी खेळाने सुरुवात केली. 6-4 अशी आघाडी रायगड संघाकडे होती.

सामन्यांच्या 13 व्या मिनिटाला 7-7 असा सामना बरोबरीत सुरू होता. दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर आपला खेळ करत होते. पुणेच्या भूषण तपकीरने आज पुन्हा बदली खेळाडू म्हणून येत सामना फिरवण्यासाठी प्रयत्न केले. मध्यंतराला 5 मिनिटं शिल्लक असताना भूषण तपकीरने सुपर रेड करत रायगड संघाला ऑल आऊट करत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला पुणे पलानी टास्कर्स संघाकडे 14-9 अशी आघाडी होती.

रायगड संघाच्या रुतिक पाटीलने आक्रमक चढाया करत मध्यंतरा नंतर पुणे संघाला ऑल आऊट करत सामना अक्षरशः फिरवला. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना रायगड कडे 21-17 अशी आघाडी होती. प्रशांत जाधवने सुपर रेड करत रायगड संघाची आघाडी वाढवली.

शेवटच्या मिनिटापर्यत रंगलेल्या ह्या सामन्यांत रायगड संघाने 29-26 असा विजय मिळवला. रायगड कडून रुतिक पाटीलने सुपर टेन पूर्ण करत विजयात मोलाची भूमिका बजावली. तर त्याला कर्णधार प्रशांत जाधवने चांगली साथ दिली. अजय मोरे व जयेश गावंडने प्रत्येकी 3-3 पकडी करत संघाची बचावफळी सांभाळली. पुणे कडून कृष्णा शिंदेने एकाकी झुंज देत 9 गुण कमावले.

बेस्ट रेडर – रुतिक पाटील, रायगड मराठा मार्वेल्स.
बेस्ट डिफेंडर- अजय मोरे, रायगड मराठा मार्वेल्स.*
कबड्डी का कमाल- कृष्णा शिंदे, पुणे पलानी टास्कर्स