रायगड : बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

WhatsApp Group

रायगड: वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका टोळीच्या वनविभागाने आणि पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. बिबट्याच्या नखांची विक्री करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींकडून बिबट्याची 10 नखं हस्तगत केली आहेत.

मंगेश लक्ष्मण कुर्मे – वय 45 वर्ष, नईम शेख – वय 32 वर्ष हे दोघे आरोपी निजामपूर बोरवाडी येथील रहिवासी आहेत. या दोघांनी बिबट्याची नखे विक्रीकरता आणली होती. तर आरोपीत दत्ता पवार – वय 22 वर्ष आणि मंगेश पवार वय – 35 वर्ष हे दोघे रोहा येथील रहिवासी असून ते बिबट्याटी नखं खरेदी करण्यासाठी आले होते. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत या चौघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा