
रायगड – रायगडमधून एक धक्कादायक आणि दुर्देवी बातमी समोर आली आहे. रायगडच्या ढालकाठी बिरवाडी गावामध्ये एका महिलेने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकललं.दुर्देवाने या सर्व मुलांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये यात चार मुल आणि 2 मुलींचा समावेश आहे. या महिलेने मुलांना का मारलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक आमदार भरत गोगावलेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.