
आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (India Tour Of Ireland) घोषणा बीसीसीआयने केली आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात पहिल्यांदाच पुणेकर राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) निवड झाली आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये राहुलनं दमदार कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर राहुलला ही संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची आयर्लंड मालिकेसाठी निवड झाली आहे.
आयर्लंड मालिकेसाठी संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याच क्रमात दमदार फलंदाज राहुल त्रिपाठीचेही नाव आहे. राहुलची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये राहुलने दमदार फलंदाजी केली आहे.
India Squad
Hardik Pandya (C), Bhuvneshwar Kumar (vc), Ishan Kishan, Ruturaj Gaikwad, Sanju Samson, Suryakumar Yadav, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Rahul Tripathi, Dinesh Karthik (wk), Yuzvendra Chahal, Axar Patel, R Bishnoi, Harshal Patel, Avesh Khan, Arshdeep Singh, Umran Malik— BCCI (@BCCI) June 15, 2022
31 वर्षांचा राहुल त्रिपाठी आयपीएल (Indian Premier League) इतिहासात सर्वात जास्त रन करणारा अनकॅप्ड बॅटर आहे. त्याने आत्तापर्यंत 1798 रन केले आहेत. या यादीमध्ये मनन व्होरा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 1073 रन केले आहेत. तर 798 रनसह मनविंदर बिस्ला तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2022 मध्ये राहुलने सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळताना 14 सामन्यात 413 रन केले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 158. 24 इतका होता.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक