शिंदे सरकारने मारली बाजी, राहुल नार्वेकर १६४ मतांसह विधानसभा अध्यक्षपदी विराजमान

WhatsApp Group

मुंबई – एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) आज पार पडली. शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे.

एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली आहे. शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांचा अल्पपरिचय