संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा दुसरा दिवस होता. दरम्यान, लोकसभेत सकाळपासूनच राहुल गांधींच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. याच चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या महिला खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर मोठा आरोप केला आहे. स्मृती इराणी यांनी आरोप केला की, त्यांचे भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी फ्लाइंग किस केला.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, लोकसभेत माझ्या आधी ज्याचे संबोधन (राहुल गांधी) होते, त्यांनी सभागृहात बेफिकिरी दाखवली आहे. राहुल गांधींनी पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला आहे. भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी महिलांकडे फ्लाइंग किस केला. हे चुकीचे वर्तन आहे.
#WATCH | Union Minister and BJP MP Smriti Irani says, “I object to something. The one who was given the chance to speak before me displayed indecency before leaving. It is only a misogynistic man who can give a flying kiss to a Parliament which seats female members of Parliament.… pic.twitter.com/xjEePHKPKN
— ANI (@ANI) August 9, 2023
स्मृती इराणी इथेच थांबल्या नाहीत, त्यांनी असेही म्हटले की, असे वर्तन केवळ दुष्ट पुरुषच करू शकतो. सभागृहातील कोणत्याही खासदाराकडून अशी चुकीची वागणूक आजवर दिसलेली नाही. असं अशोभनीय वर्तन यापूर्वी कधीही देशाच्या संसदेत पाहिलं नव्हतं.
राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर केलेल्या भाषणावर स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती कोणापासून लपलेली नाही, पण एवढे होऊनही पंतप्रधानांनी आजपर्यंत तेथे भेट दिलेली नाही. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आली आहे.