French Open Final: राफेल नदालने १४वे फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले, रुडचे स्वप्न भंगले

WhatsApp Group

French Open Final : राफेल नदालने Rafael Nadal फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. पॅरिसमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नदालने आठव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना २ तास १८ मिनिटे चालला. नदालचे हे १४वे फ्रेंच ओपन जेतेपद ठरले. तसेच, नदालचे हे एकूण २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

क्ले कोर्टचा राजा अशी ओळख असलेल्या राफेल नदालने पहिल्या सेटपासूनच या सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला होता. नदालने पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कॅस्पर रुडने पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो नदालला विजयापासून रोखू शकला नाही. नदालने दुसरा सेटही ६-३ असा आपल्या नावावर केला

राफेल नदालनं फ्रेंच ओपन २०२२ जिंकून कारकिर्दीतील २२वं ग्रँडस्लॅम जिंकलं आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत तो नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा दोन ग्रँडस्लॅम पुढं आहे. २०२२ च्या फ्रेंच ओपनपूर्वी नदालनं २१ ग्रँडस्लॅम जिंकलं होतं. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांच्या नावावर २०-२० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

नदालनं 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020, 2022 मध्ये असं 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, 2009 आणि 2022 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.  याशिवाय, त्यानं 2008 आणि 2010 मध्ये वम्बिलडन आणि  2010, 2013, 2017, 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब जिंकला आहे.