ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने दानील मेदवेदेववर मात करत हा ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात मेदवेदेवने शानदार सुरुवात करत पहिले २ सेट आपल्या नाववर केले, मात्र पुढच्या ३ सेटमध्ये नदालने अविश्वसनीय खेळी करत सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवला
Another chapter is written ????@RafaelNadal defeats Daniil Medvedev 2-6 6-7(5) 6-4 6-4 7-5 to win his second #AusOpen title in an epic lasting five hours and 24 minutes.
⁰
????: @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis #AO2022 pic.twitter.com/OlMvhlGe6r— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2022
राफेल नदालने रचला इतिहास
ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ चे विजेतेपद जिंकून राफेल नदालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टेनिस इतिहासातील सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम आता राफेल नदालच्या नाववर झाला आहे.
या सामन्यापूर्वी नदाल, जोकोविच आणि फेडरर यांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम होते. मात्र आता जोकोविच आणि फेडररला मागे सारत राफेल नदाल सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानी आला आहे.