
मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आपले स्थान निर्माण केले आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने बोल्ड भूमिका केल्याआहेत. याशिवाय ती बेधडक वक्तव्यासाठीही प्रसिद्ध आहे.
ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या पोटावर जखम झालेली दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसतो आहे. हा शर्ट पोटाकडे फाटलेला असून ती आपल्याला झालेली जखम दाखवत आहे.
View this post on Instagram
तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. पण खरेतर ही खरी जखम नसून तिने शूटिंगसाठी प्रोस्थेटिक मेकअप केला होता. जो मुंबईतील उकाड्यामुळे वितळत आहे. असे राधिका या व्हिडीओमधून सांगत आहे.