मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे आणि शिंदे गट आमन-सामने

0
WhatsApp Group

ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पहायला मिळाला. जोरदार घोषणाबाजी करून दोन्ही बाजूंनी वादावादी झाली. ठाण्यातील हाजुरी परिसरात या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. ठाकरे गटाने ‘हू दे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

शिवसेनेने शिंदे गटावर आरोप करताच शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला. यानंतर वागळे इस्टेट पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. कामगार समोरासमोर आल्यामुळे हाजुरी परिसरात राजकीय तणाव पहायला मिळत आहे.