ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटर राचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

WhatsApp Group

Rachael Haynes Retirement: ऑस्ट्रेलिया महिला संघाची उपकर्णधार आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती राचेल हेन्सने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी महिला बिग बॅश लीग ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, याचीही तिनं पुष्टी केलीय. तिने देशासाठी 84 टी-20, 77 एकदिवसीय आणि 6 कसोटी सामने खेळले आहेत.

हेन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये जवळपास 4000 धावा केल्या आहेत, 2009 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणात 98 धावा, दोन एकदिवसीय शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. ती तिच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखली जाते.