ND v AFG: दिर्घ काळानंतर ‘या’ दिग्गजाचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन

WhatsApp Group

अबू धाबी –  टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यासाठी भारताने आपल्या ‘अंतिम ११’ मध्ये २ मोठे बदल केले आहेत.


अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताच्या ‘अंतिम ११’ मध्ये रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आले आहे. दिर्घ काळानंतर अश्विनचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन झाले आहे. तर सूर्यकुमार यादवही संघात परतला आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध असा आहे भारताचा ‘प्लेइंग XI’ संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रवी अश्विन, जसप्रीत बुमराह.