Quotes in Marathi | नविन सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

WhatsApp Group

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना तर सुविचाराचे महत्त्व माहीत आहेत. रोज सकाळी फळ्यावर एक सुविचार सुवाच्च अक्षरात लिहिलेला हमखास प्रत्येक शाळेत दिसून यायचा. हेच सुंदर सुविचार मराठी (Quotes in Marathi) आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात. असेच मराठी सुविचार आम्ही या लेखात देत आहोत. 

  1. पुण्य करताना येणारा मृत्यू केव्हाही चांगला मात्र पाप करताना मिळालेला विजय वाईटच.
  2. व्यक्तीची ओळख चेहरा किंवा कपड्यांवरून नव्हे, त्याची वागणूक आणि गुणांवरून होती.
  3. कष्टाने शरीर सुदृढ होते तर जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे बौद्धिक क्षमता वाढते.
  4. सुख आणि दुःख आपोआप येत नाही ते आपण केलेल्या कर्माचे फळ असतं.
  5. कधीकधी अगदी छोटे निर्णय पण आपल्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवतात.
  6. “मी सर्वश्रेष्ठ” हा आत्मविश्वास आहे… आणि “मीच सर्वश्रेष्ठ” हा अहंकार आहे.
  7. ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान होत नाही, त्या समाजाचे पतन निश्चित आहे.
  8. काळानुसार चालले नाही तरी चालेल, मात्र सत्या सोबत रहा काळ तुमच्यासोबत येईल.

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार आचरणात आणायला हवे.

9. माणूस जेव्हा असामान्य कार्य करून दाखवतो, तेच त्याच्या यशाचे खरे कारण ठरते.
10. प्रत्येक जिवंत प्राण्याबद्दल दयेचे भावना ठेवा घृणा नेहमीच विनाश घडवते.
11. एकतेमुळे आपले अस्तित्व कायम राहते, आणि विभाजनामुळे सर्वांचेच पतन होते.
12. आपली मनोवृत्ती हीच आपले मोठेपण निश्चित करत असते.
13. जो प्रचंड आशावादी आहे, तो लाख वेळा हरला तरी पूर्ण पराभूत होत नाही.
14. भूतकाळापासून शिका, वर्तमानासाठी जगा आणि भविष्यासाठी आशावादी राहा.
15. जे लोक सत्याचा सहज स्वीकार करतात, त्यांनाच ईश्वराची वाणी ऐकू येत असते.
16. ज्या ज्ञानाचा वापरत वापरच होत नाही, ते ज्ञान काय कामाचे आहे?

आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करण्याची ताकद ठेवते, फक्त स्वतःवर आत्मविश्वास हवा, जसे लहान मुलाला आईच्या दुधाची आवश्यकता असते, एखाद्या रोपट्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे जिंकण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे असते.

17. एका इच्छेने काहीच बदलत नाही, एक निर्णय काहीतरी बदल करू शकतो. मात्र एक निश्चय सर्वकाही बदलून टाकतो.
18. खरी स्तुती करणे हा एक अमूल्य खजाना आहे. याआधारे बोलणारा लोकांचे मन जिंकतो.
19. असत्य चांगल्या ढंगात सांगावे लागते, सत्य मात्र कोणत्याही ढंगात कडवेच असते.
20. जेथे प्रयत्नांची उंची अधिक असते, तेथे नशीब वाल्याला ही झुकावे लागते.
21. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो.
22. आव्हाने तर येतच राहतील… तोच जिंकतो, जो त्यांचा सामना करतो.
23. विचार केवळ वाचून बदल होत नाही, या विचारांच्या आधारे वाटचाल करून परिवर्तन घडत असते.
24. माणसाच्या गरजा बदलतात, तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलते.

कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रम्हांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही.