PV Sindhu, Singapore Open 2022: पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये चीनच्या वांग झि यिचा पराभव करत पटकावले विजेतेपद

WhatsApp Group

PV Sindhu, Singapore Open 2022: भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन 2022 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत चीनच्या वांग जी यीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या बिगरमानांकित सायना कावाकामीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. सिंधूने उपांत्य फेरीत 21-15, 21-7 अशा फरकाने सहज विजय मिळवला होता.

सिंधू आणि वांग यांच्यात रोमांचक सामना

सिंधूसाठी जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या वांग झि यिला पराभूत करणे सोपे नव्हते. तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात सिंधूने विजयाने सुरुवात केली. तिने पहिल्या सेटमध्ये चीनची वांगचा 21-9 असा पराभव केला. त्यानंतर वांगने पुनरागमन करत दुसरा सेट 21-11 असा जिंकून सामना बरोबरीत आणला.