नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा; नितेश राणे

WhatsApp Group

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर देवदेवतांचे फोटो छापण्याचे विधान करून राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे. आता भारतीय चलनावर वेगवेगळी चित्रे छापण्याची मागणी नेते करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र छापण्याची मागणी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केली आहे. त्यांच्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी थेट फोटोशॉप केलेल्या 200 रुपयांच्या नोटेचा फोटो शेअर केला असून, या नोटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे.

कणकवलीचे आमदार राणे यांनी हा फोटो ट्विट करून हे बरोबर आहे असं लिहिले आहे. ही माझी वैयक्तिक भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना देशात नाही तर जगात मान्यता आहे. असं राणे म्हणाले आहेत. नोटेवरील चित्र बदलण्याची मागणी केजरीवाल यांच्यापासून सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या सूचना केल्या आहेत.