‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने खलीसोबत लावली पुशअप्सची स्पर्धा, कोण जिंकलं असेल? पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

द ग्रेट खलीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. भारतापासून WWE पर्यंत खलीने देशाचे नाव खूप रोशन केले आहे. सध्या खली उर्फ ​​दिलीप सिंग राणा जालंधरमध्ये CWE रेसिंग अकादमी चालवतो. एवढेच नाही तर खली सोशल मीडियावर बराच वेळ घालवतो. पण सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुस्तीपटू खली बॉलिवूड अभिनेत्यासोबत पुशअप्ससाठी स्पर्धा करताना दिसत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आदित्य रॉय कपूर त्याच्या आगामी चित्रपट राष्ट्र कवच ओमच्या प्रमोशनसाठी CWE अकादमीमध्ये पोहोचला. यादरम्यान आदित्य द ग्रेटला भेटला. चित्रपटाची अभिनेत्री संजना संघवीही आदित्यसोबत दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

त्यानंतर खली आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात पुशअप्सची स्पर्धा झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खली आणि आदित्य पुशअप करताना दिसत आहेत. अभिनेत्री संजना संघवी आणि तिथे उपस्थित असलेले लोक जल्लोष करत होते. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की खली खचून जातो आणि हा सामना आदित्यकडून हरतो. हा सामना विनोद म्हणून ठेवण्यात आला होता.